महाराष्ट्र बँकेचा जळकोट येथे वर्धापन दिन साजरा

384
जळकोट,दि.२० , मेघराज किलजे

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालय, शेतकरी, ग्राहक व माजी सैनिक संघटना यांच्यावतीने महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा वर्धापन दिन जळकोट शाखेत साजरा करण्यात आला.

जळकोट येथील शिवाजी चौकातील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेत बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त जळकोट शाखेच्या व्यवस्थापिका सौ. सुप्रिया परळकर, बँक अधिकारी ओंकार पाखरकर, कॅशियर प्रवीण इंगळे, बँक मित्र गणेश वागदरे तसेच बँक कर्मचारी अलताफ जमादार यांनी शेतकरी व ग्राहकांना चांगली सेवा देत असल्याबद्दल श्री गणेश कृषी विज्ञान मंडळ व कृषी वाचनालयाचे अध्यक्ष व पत्रकार मेघराज किलजे,ग्रा.प. सदस्य कस्तुरा कारभारी, भारतीय सैन्यदलातील माजी ऑर्डरी कॅप्टन बाबुराव जाधव, शेतकरी शेषराव कदम, शेतकरी संजय घोडके यांच्या हस्ते फेटा, शाल, हार व श्रीफळ देऊन सन्मान करुन बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी बोलताना बँकेच्या व्यवस्थापिका सुप्रिया परळकर म्हणाल्या की, पूर्वीच्या मराठवाडा ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँक असे नामकरण झाले आहे. जळकोट व परिसरातील शेतकरी व ग्राहकांना उत्तमरित्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असतो. शेतकरी व ग्राहकही चांगला प्रतिसाद बँकेला देतात. भविष्यात गावात एटीएम सेवा व इतर सुविधा बँकेमार्फत देण्यात येणार आहेत. त्याचा लाभ शेतकरी व ग्राहकांनी घेण्याचे आवाहन परळकर यांनी यावेळी केले. प्रस्ताविक मेघराज किलजे यांनी करून वर्धापन दिन साजरा करण्याची भूमिका ग्राहकांना सांगितली.

यावेळी मानमोडी चे शेतकरी प्रेमनाथ सुरवसे, पोपट सुरवसे, शिवा कुंभार, धनाजी गंगणे, राजकुमार छत्रे, दत्तात्रेय सोमवंशी, प्रमोद अंगुले, सुनील साखरे आदी सह शेतकरी, ग्राहक, ग्रामस्थ उपस्थित होते.
error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!