महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचे आमदार सुजितसिंह ठाकूर हेच खरे दावेदार..!

81

उस्मानाबाद : इकबाल मुल्ला

उस्मानाबाद जिल्ह्यातील सुजितसिंह ठाकूर हे महाराष्ट्रातील सलग तिसऱ्यांदा सरचिटणीस पदावर कार्यरत असणारे पहिले नेते आहेत. त्यामुळे मराठवाड्यात त्यांच्या धडाकेबाज कामगिरीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा बळं निर्माण झाला आहे. ठाकूर हे सर्वसामान्यांचे कार्यकर्ते आहेत तर तळागाळातील जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सन्मान देणारे नेते आहेत, म्हणून ते सर्वत्र सांगत असतात की मी कार्यकर्त्याचा – कार्यकर्ता आहे.
सलग 3 वेळा सरचिटणीस पदावर काम करणारे सुजितसिंह ठाकू महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना हे चांगल्या परिचयाचे असून, त्यांच्या कामाच्या एका विशिष्ट आणि आखणी पूर्ण पद्धतीने कार्यकर्ते अगदी त्यांच्याविषयी नेहमीच सन्मानाची भावना व्यक्त करतात.

मराठवाड्यातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्प साठी अगदी झोकून देणारे आमदार सुजितसिंह ठाकूर म्हणजे एक मोठे वादळच आहे. ते मराठवाड्यातीलविकासाच्या कोणत्याही प्रश्नावर कितीही ताकत लावून सदरची विकास योजना मराठवाड्यात लागू करण्यासाठीचे सर्व प्रकारचे प्रयत्न करून सरकारला ती योजना करायला भाग पाडत असतात.

महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त गंभीर दुष्काळ असणारा उस्मानाबाद जिल्ह्यात त्यांचे सतत लक्ष असून या जिल्ह्यातील सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या सतत संपर्कात राहून शासन दरबारी जिल्ह्याची कोणतीही मागणी पडून राहू नये यासाठीचा पाठपुरावा करीत असतात.

अनेक वर्षे रेंगाळत असलेला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या विषयात आमदार ठाकूर साहेबांचे मोठे योगदान असून त्यांनी आत्तापर्यंत या विषयासाठी पत्रव्यवहार करून अनेक बैठका घेऊन शासनाला करोडो रुपयांचा निधी देण्यास भाग पाडले आहे. त्यामुळेच आज हा प्रकल्प बऱ्यापैकी स्वरूप धारण करत आहे, या सगळ्यांमध्ये सुजितसिंह ठाकू यांचे मोलाचे योगदान आणि पाठपुरावा कारणीभूत ठरला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील रस्ते असतील विजेच्या समस्या, पाणीपुरवठ्याचे मोठ – मोठ्या योजना असतील, त्याचप्रमाणे आरोग्य सुविधांच्या बाबतीत कोणत्याही अडचणी असतील तर आमदार सुजितसिंह ठाकूर राज्यातील मंत्र्यांबरोबर वारंवार भेटी घेऊन बैठका लावून यावर जिल्ह्याला जास्तीत जास्त योजनांचा फायदा मिळून घेण्यात ते सक्रिय असतात.

उस्मानाबाद जिल्ह्यातील पिक विमा असेल कर्जमाफी असेल, यावर जास्तीत जास्त फायदा या ठिकाणच्या शेतकऱ्यांना मिळवून देण्यात ठाकूर यांचे योगदान आहे.

तुळजापूर येथील वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्याबरोबर सातत्याने पत्रव्यवहार तसेच वारंवार बैठका घेऊन ठाकूर यांनी वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणे कामी मोलाची भूमिका बजावत आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे या तीर्थक्षेत्री महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी च्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील भाविकांना सुखकर प्रवासासाठी म्हणून सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद असा रेल्वे मार्ग टाकण्यासाठी शासन दरबारी नव्हे तर दिल्लीपर्यंत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी सतत चर्चा करून, बैठका घेऊन, दौरे आखून आमदार ठाकूर यांनी हा रेल्वेप्रश्न मार्गी लावला आहे. आणि येत्या काळात लवकरच या रेल्वे मार्गाचे काम सुरू होणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे विणले असेल तर ते आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी, यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते, ग्रामविकास विभाग या सर्वांशी सतत पाठपुरावा करून अधिकाऱ्यांना पुढे घेऊन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून उस्मानाबाद जिल्ह्यातील जास्तीत – जास्त रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळविला आहे. या रस्त्यांमुळे जिल्ह्यातील प्रवास सुखकर करण्यामध्ये मोलाचा वाटा आमदार ठाकूर यांचा आहे.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश च्या सर्वच सभा, बैठका, दौरे यामध्ये ठाकूर साहेब यांचे फार मोठे नियोजन आणि सूत्रबद्धता पक्षाच्या वाढीला खूपच मोलाची ठरली आहे. त्यामुळेच प्रदेश भारतीय जनता पार्टीमध्ये उस्मानाबादचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे नाव घेतल्याशिवाय प्रदेश भाजपा कार्यकारिणी तयार होऊ शकत नाही. असे एक वैशिष्ट्य त्यांनी त्यांच्या कामातून निर्माण करून ठेवले आहे.

राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध ठेवून भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठीचे सर्व प्रयत्न करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावणारे सुजितसिंह ठाकूर यांचे कर्तृत्व यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिसून आले आहे.

त्यांनी नांदेड जिल्ह्यात केलेले कार्य पाहता, त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील यांच्या कार्यशैलीचा उपयोग पक्षाच्या वाढीसाठी झाल्यामुळे या ठिकाणचे दोन्ही खासदार निवडून आणण्यात आमदार सुजितसिंह ठाकूर यांची दूरदृष्टी पक्षाला लाभदायी ठरल्याचे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात चर्चिले जात आहे.

महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये काम करतांना कार्यकर्त्यांना न्याय देणारे आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबत महाराष्ट्रातील कोणत्याही कार्यकर्त्याला ठाकूर साहेब यांच्या दावेदारीला पाठिंबाच असल्याचे सर्वसामान्य कार्यकर्ते बोलत आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी तसेच पक्षाच्या मजबुतीसाठी निष्ठेने काम करण्यात व्या कार्यकर्त्यांमध्ये आमदार सुजितसिंह ठाकूर यांचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांच्या मनात पोचल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!