मुरुम पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन लाख रुपये किंमतीचे विदेशी दारु जप्त

262

मुरुम, दि. 6 : उमरगा तालुक्यातील काळनिंबाळा येथे शनिवार दि. 5 जानेवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अचानक छापा मारुन सुमारे दोन लाख रुपये किंमतीची विदेशी दारु जप्त केली. याप्रकरणी दोघांविरुध्द कारवाई करण्यात आली.

अमर प्रकाश येडगे (रा. येणेगूर, ता. उमरगा), कमलाकर गोविंद कुलकर्णी (रा. कलदेव निंबाळा, ता. उमरगा) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. आरोपींकडून शनिवार रोजी काळनिंबाळा येथे विदेश दारुच्या 1 हजार 398 बाटल्या, किंमत 2 लाख 7 हजार 210 रुपयेचा मुद्देमाल जप्त केला.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!