मुलीस पळविल्याने पोलिसांत गुन्हा दाखल

208

नळदुर्ग, दि. 3 : बाभळगाव ता. तुळजापूर येथून एक सतरा वर्षीय मुलगी ही घरातुन कॉलेजला जाते म्हणून दि. 1 जानेवारी रोजी गेली. ती घरी परत न आल्याने तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळून नेले असावे म्हणून पिडीत मुलीच्या पित्याच्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरुध्द दि. 2 जानेवारी रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!