यंदा साहित्य संमेलन यजमानपदाचा सुवर्णयोग ;  अध्यक्ष तावडे यांचे प्रतिपादन

111

उस्मानाबाद दि .१२
पाच वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवल्यामुळे यंदा 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या याजमानपदाचा सुवर्णयोग आहे. समाजाच्या सर्व घटकांतील नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नाच्या बळावर हे संमेलन यशस्वी करण्यासाठी आपण सज्ज आहोत. हाच विश्वास साहित्य महामंडळाला दाखवून देणे गरजेचे आहे. त्यासाठी 17 जुलै रोजी होणार्‍या बैठकीत सर्वांच्या सहकार्याने हे संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी आपण सर्व पातळ्यांवर सज्ज आहोत याची खात्री महामंडळास वाटायला हवी. त्यासाठी पूर्ण क्षमतेनीशी प्रयत्न करू या असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष नितीन तावडे यांनी केले.

आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीचा आढाव घेण्यासाठी साहित्य महामंडळाची स्थळ पाहणी समिती बुधवार 17 जुलै रोजी उस्मानाबाद येथे येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर बुधवारी शहरातील हॉटेल रोमा पॅलेस येथे मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकारी आणि सदस्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तावडे यांनी पूर्वतयारीच्या अनुषंगाने विस्तृत मांडणी केली. साहित्य महामंडळाचे कार्यवाह दादा गोरे यांनी मराठवाडा साहित्य परिषदेच्या उस्मानाबाद शाखेकडे पत्राद्वारे स्थळ पाहणीसाठी 16 व 17 जुलै रोजी स्थळ पाहणी पथक उस्मानाबाद येथे येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.त्यानुसार संमेलनाच्या आयोजनाबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत संमेलन आयोजनासाठी निधी संकलन, एकूण मनुष्यबळ, संमेलनासाठी योग्य जागा, निमंत्रितांची व प्रतिनिधींची निवास व्यवस्था आदींबाबत बैठकीत सर्वांगाने चर्चा करण्यात आली.

शहर व परिसरातील प्रमुख पाचशे संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकत्यार्ंना या 17 जुलै रोजी होणार्‍या बैठकीबाबत निमंत्रित करण्याचे यावेळी ठरविण्यात आले. शहरातील पुष्पक मंगल कार्यालय बुधवार, 17 जुलै रोजी सकाळी 10 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

तत्पुर्वी संमेलनाच्या मुख्य मंडपासाठी आवश्यक असलेल्या जागांची पाहणी केली जाणार आहे. तब्बल 92 वर्षानंतर उस्मानाबादकरांसाठी निर्माण झालेली ही संधी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी समाजाच्या प्रत्येक घटकातील सहभाग आवश्यक असल्याचे आवाहनही मसापचे अध्यक्ष नितीन तावडे यांनी केले आहे.
साहित्य संमेलन मागणीसाठी मराठवाडा साहित्य परिषदेच्या मागणीला समर्थन देण्यासाठी ठराव घेतल्याबद्दल तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, उस्मानाबाद नगर परिषद, जिल्हा मुख्यध्यापक संघ यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वांच्या उपस्थितीत घेण्यात आला.

बैठीकीचे प्रस्तावित आणि आभार बालाजी तांबे यांनी मानले. मराठवाडा साहित्य परिषदेचे 60 आजीव सभासद यावेळी उपस्थित होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!