यवतमाळ : ७० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त; दोघांना अटक

61

यवतमाळ : सुशील भगत

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील लोही येथे पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्यांचा पर्दाफाश केला असून दोघांना अटक करून त्यांच्या कडून ७० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. दारव्ह्याच्या ठाणेदार रिता उईके यांच्या पथकाने गोपनीय माहितीवरून गुरुवार रोजी पहाटे 2 वाजता ही कार्यवाही केली.

जगदीश पंढरीदास खर्डेकर वय ४२ वर्ष रा. लोही व स्वप्नील देविदास चव्हाण वय २१ रा. दारव्हा अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या ५० हजार रुपये किमतीच्या नोटा तर २०० रुपये किंमतीच्या २० हजार रुपयांच्या किंमतीच्या बनावट नोटा तसेच लॅपटॉप स्कॅनर कलर प्रिंटर इंक छपाई कागद दुचाकी असा एक लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दारव्हा पोलिसांनी जगदिशच्या घरावर धाड टाकली असता स्वयंपाक खोलीत ते बनावट नोटा तयार करताना आढळून आले. या टोळीत आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध पोलीस घेत असून पथकात व्यंकटेश मच्छेवार कैलास लोथे राजेश लाखकर साजिद खान वासिम शेख रणजित रबडे शुभांगी उईके या पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!