रविशंकर सीबीएसई विद्यालयात निघाली चिमुकल्याची दिंडी

57

उमरगा दि.१२ – येथील श्री श्री रविशंकर सीबीएसई , प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात शाळेत पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव हा सांस्कृतीक वारसा जपण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेचे अध्यक्ष डॉ दीपा मोरे , डॉ .सुरेश चव्हाण , डॉ उदयसिंह मोरे यांच्या हस्ते विठूरायाचे पूजन करून पालखी सोहळ्याचा शुभारंभ झाला. श्री श्री शाळेतील चिमुकल्यांच्या रूपात अयोध्या नगरात अवघा संतांचा मेळा अवतरला. खांद्यावर दिंडी, दिंडीच्या अग्रभागी विठ्ठल-रूक्मिणी, त्यांच्या मागे विठुनामाचा गजर करणारे बाल वारकरी असा नयनरम्य बालदिंडी सोहळा याठिकाणी अनुभवयास मिळाला. शाळेच्या प्रांगणासह संपूर्ण शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील वातावरण अवघे विठ्ठलमय झाले होते.

झाडे जगवा झाडे लावा , बेटी बचाव , बेटी पढाओ असे जन जागृतीचे संदेश देण्यात आले. यावेळी ७०० विद्यार्थी व विद्यार्थीनींनी , ५० शिक्षक कर्मचारी व संस्थेचे संस्थापकानी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला . शाळांतर्फे दिंडी काढण्यात आलेल्या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुख्मिणी संत ज्ञानेश्‍वर, निवृत्ती, मुक्ताबाई, एकनाथ, तुकाराम अशा विविध वेषभूषा साकारल्या होत्या. विद्यार्थ्यांनी साकारलेली वेशभुषा लक्षवेधी ठरत होती. पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव हा सांस्कृतीक वारसा जपण्यासाठि श्री श्री रविशंकर विद्यामंदिर शाळेने आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेतील चिमुकल्यांच्या रूपात अवघा संतांचा मेळा अवतरला. खांद्यावर दिंडी, दिंडीच्या अग्रभागी विठ्ठल-रूक्मिणी, त्यांच्या मागे विठुनामाचा गजर करणारे बाल वारकरी असा नयनरम्य बालदिंडी सोहळा याठिकाणी अनुभवयास मिळाला. शाळेच्या प्रांगणासह संपूर्ण शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील वातावरण अवघे विठ्ठलमय झाले होते. श्री श्री रविशंकर विद्या मंदीर यांच्या विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त काढण्यात आलेल्या दिंडीने शाळेचा परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषात संपूर्ण विठ्ठलमय झाला.हा सोहळा मुख्याध्यापक दिगंबर कुलकर्णी , सीबीएसई चे मुख्याद्यापक गणपत देवकर , प्राथमिकचे मुख्याद्यापक हिरानाथ सगर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली .

यशस्वीतेसाठी सुधाकर महामुनी , उमेश खमीतकर दर्शन सुरवसे , संतोष हर्के ,सुधाकर जाधव , अजय मोरे , शेखर स्वामी , वैभव सोनवणे ,स्नेहल टीकाबरे , लक्ष्मी बिराजदार , पोतदार राजेंद्र , सुरेखा सगर , बालिका हूलपले , रूपा पाटील , प्रीती इंगळे , शिवराम भोसले , ओंकार इंगळे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!