राष्ट्रवादीचे अशोक जगदाळे येत्या चार दिवसात आपली भुमिका स्पष्ट करणार – पञकार परिषदेत दिली माहिती

85

नळदुर्ग, दि. १२ : राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे हे चार दिवसात आपली भूमिका जाहीर करणार असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मनोमिलन मेळव्यापासून जगदाळे यांना प्रचारापासून दूर ठेवण्यात आले असून त्यामुळे सध्या तुळजापूर तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. या अनुषंगाने अशोक जगदाळे यांनी गुरूवार दि.११ रोजी पत्रकार परिषद घेऊन येत्या चार दिवसात आपली राजकीय भुमिका जाहीर करणार आसल्याचे सांगितले.

तुळजापूरचे आमदार मधुकरराव चव्हाण यांनी राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे तक्रार करत आपणास लोकसभा निवडणूकीच्या प्रचारापासून दुर ठेवण्यास सांगितल्याचा आरोप यावेळी जगदाळे यांनी केला.

यावेळी जगदाळे म्हणाले की, मी तुळजापूर येथील मनोमिलन मेळाव्यासाठी निघालो असतानाच आमदार मधुकरराव चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे लोकसभा उमेदवार तथा जिल्हाध्यक्ष आ. राणाजगजितसिंह पाटील यांना सांगून मला मेळव्यात येण्यापासून रोखण्यात आले. बीड, उस्मानाबाद लातूर विधानपरिषद निवडणूकीच्या वेळी मी स्वतः राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होतो. तसेच मागील पाच वर्षात तुळजापूर तालुक्यातील सर्वच निवडणूका आम्ही संपुर्ण ताकद लावून लढलो व यश संपादन केले आहे. माञ असे असताना तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आनेक पदाधिका-यांना डावलून सर्व सुञ काँग्रेसचे आमदार व त्यांच्या पूञाच्या हातात देण्यात आले आहेत. पक्षाच्या निष्ठावान पदाधिका-यावर हा अन्याय आसून काँग्रेस आमदार व त्यांच्या पुञाच्या हट्टापाई आम्हाला प्रचारापासून दुर रहावे लागत आहे. तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या काँग्रेसच्या दावणीला बांधण्यात आला आहे. निवडणूकीचे सर्व सुञे अणदुरकरांच्या हाती आहेत. आम्ही पक्षाच्या विरोधात नसून पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यानीच आम्हाला प्रचारापासून दुर ठेवले आहे. पुढील चार दिवसात विधानसभेच्या दृष्टीने निर्णय घेणार असून आपली भुमिका त्यावेळी जाहीर करू. असे जगदाळे यांनी सांगितले.

मागील काही दिवसापासून सोशल मीडियावर जगदाळे यांना आमदारांनी रोखल्याचे बातम्या येत असून तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यावर आन्याय होत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी विशेषतः जगदाळे समर्थकात असंतोषाचे वातावरण आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!