लोहारा तालुुका भाजपाच्यावतीने दहावीतील गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

104

उस्मानाबाद : इकबाल मुल्ला

लोहारा तालुका भाजपाच्यावतीने शहरातील लोकवाचनालय येथे दि.13 जुन रोजी तालुक्यातील व शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहरातील नगराध्यक्ष सौ.ज्योतीताई दिपक मुळे होत्या तर प्रमुख म्हणुन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष कैलास (दादा) शिंदे, भाजपा तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी, कृषी उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक तथा भाजपा तालुका उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती तज्ञ संचालक हाजी बाबा शेख, दिपक मुळे, पं.स.सदस्य वामन डावरे, पं.स. सदस्य ज्ञानेश्वर परसे, अदि उपस्थित होते.

यावेळी माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी शिवानी बेशीकराव ()97.60%, हिंदवी जगदिश लांडगे (95.60%), मानसी सितापुरे (95%), ऐश्वर्या डावरे (92.20%), संज्योत सुर्यवंशी (89%), स्वप्नाली भोंडवे (87.20%), मोनिका जट्टे (84.40%), सिफा लांडगे (84.40%), शाहिस्ता शेख (83.40%), जलाल इकबाल मुल्ला (83%), आहिल्या दगडु तिगाडे (78%), या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना भाजपाच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते ट्राफी, शाल, पुष्प गुच्छ देवुन सन्मान करुन गौरविण्यात आले. यावेळी कैलास शिंदे, विक्रांत संगशेट्टी, प्रा.बालाजी डावरे, यांनी विद्यार्थ्याना सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेट्टी व सुत्रसंचालन पं.स.सदस्य वामन डावरे यांनी केले तर आभार काशीनाथ घोडके यांनी मानले. या कार्यक्रमास भाजपा मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, किसान आघाडी तालुकाध्यक्ष सुनिल सुर्यवंशी, शंकर मुळे, सुरज माळवदकर, दिनेश बायस, सुमित झिंगाडे, प्रा.बालाजी डावरे, विजय महानुर, मनिषा महानुर, जयश्री लांडगे, शिध्देश्वर बिडवे, परमेश्वर कदम, आब्बास शेख, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!