लोहारा येथे जाधव व कदम यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

132

उस्मानाबाद : इकबाल मुल्ला

लोहारा-गटशिक्षण कार्यालय, पंचायत समिती लोहारा येथे कार्यरत असलेले माकणी बीटचे विस्तार अधिकारी सी.एस.जाधव व पाणीपुरवठा कार्यालय तथा गटशिक्षण कार्यालय येथील लिपिक डि.एस. कदम यांचा सेवानिवृत्त निमित्त निरोप समारंभ कार्यक्रम शहरातील गटशिक्षण कार्यालयात घेण्यात आला.

यावेळी यांचा गटशिक्षण कार्यालय व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, तुगाव व ग्रामस्थांच्यावतीने सहपत्निक सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी टि.एच.सय्यदा होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणुन कार्यालयीन विस्तार अधिकारी एन.टी.आदटराव, विस्तार अधिकारी डी.एम.जंगम, आर सी.मैंदर्गी, केंद्रप्रमुख मनोहर वाघमोडे, मधुकर भरगंडे, मोहन शेवाळे, राम चव्हाण, बी.बी.पवार शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष सुदर्शन जावळे, केंद्रिय मुख्याध्यापक विश्वजित चंदनशिवे, मधुकर रोडगे, पवन सुर्यवंशी, विकास घोडके, सुर्यकांत पांढरे, अदि उपस्थित होते.
यावेळी सुर्यकांत पांढरे, मनोहर वाघमोडे, डी.एम.जंगम, एन.टी.आदटराव, विकास घोडके, गटशिक्षणाधिकारी सय्यदा मँडम यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांनी त्यांच्या दिर्घोआयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रत्येकांनी मनोगतातुन सत्कारमुर्तीच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी जाधव सी.एस व कदम सी.एस यांनी मनोगतातुन कृतज्ञता व्यक्त केली. व नौकरी करताना आलेले अनुभव सांगितले. या कार्यक्रमास राजेंद्र माळवदकर, पंडीत राठोड, मनोरथ भोजने, रसुल शेख, बालाजी आलमले, अशपाक शेख, यांच्यासह तुगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सुञसंचलन रंजना मैंदर्गी यांनी केले तर आभार राम चव्हाण यांनी मानले. कार्यक्रम यशस्वि करण्यासाठी आनंद सोनकांबळे, अनंत लहाने, रविशंकर आगळे, विलास शिंदे, श्रीमंत काळे, सुरेश तावरे, हणमंत दुधभाते, प्रशांत खोचरे, अदिंनी परिश्रम घेतले.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!