वडगाव काटी येथे शाॅटसर्कीटने द्राक्षबाग जळाल्याने लाखोंचे नुकसान

46

काटी : उमाजी गायकवाड

तुळजापुर तालुक्यातील वडगाव काटी येथील शेतकरी संपत शंकर चुंगे यांची गट नं 282 मधील असलेली द्राक्षबाग दि.11 रोजी पहाटे शाॅटसर्कीटने जळुन खाक झाली असुन तीन ते चार लाखाचे नुकसान झाले असल्याचे नुकसानग्रस्त शेतकरी संपत चुंगे यांनी सांगितले आहे.

दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे घागरभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. तुळजापुर तालुक्यातील वडगाव (काटी ) येथे तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.बैलगाडीमधुन पाणी आणावे लागत आहे.अशातच येथील शेतकरी संपत शंकर चुंगे यानी पाणी विकत घेऊन कशीबशी द्राक्षबाग जोपासली परंतु दि.11 रोजी पहाटेच्या सुमारास शेतातील विद्युत तारेच्या घर्षणाने गट नं. 282 मधील दोन एकर द्राक्षबाग जळुन खाक झाली असुन तीन ते चार लाख रूपयेचे नुकसान झाले असल्याचे संपत चुंगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

सदरील घटनास्थळाची महावितरणचे कर्मचारी व तलाठी सज्जाचे झिरो कर्मचारी यानी पाहणी केली व पंचनामा केला परंतु महावितरण अधिकारी व तलाठी अजुन फिरकलेच नसल्याचे चुंगे यानी सांगितले.बॅकेचे कर्ज काढुन व पाणी विकत घेऊन जोपासलेली द्राक्षबाग शाॅटसर्कीटने जळाल्याने व अस्मानी संकटाचा सामना करत असलेल्या शेतकर्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असले तरी नेतेमंडळी व स्थानिक गाव पुढार्‍यांनी मात्र या घटनेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जात आहे. वरिष्ठांनी यामध्ये लक्ष घाल नुकसानग्रस्त शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकर्‍यांमधून केली जात आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!