वडगाव लाख येथे पैशाच्या वादातून हॉटेल व्यावसायिकास मारहाण

124

तुळजापूर, दि. 25 : तालुक्यातील वडगाव लाख येथील हॉटेल व्यवसायिकास पैसे देणे-घेण्याच्या कारणावरून तलवारीने व दगडाने मारून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवार दि.२४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास वडगाव लाख येथे घडली असून पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बंडू उमरावं लोहार वय ३५ वर्षे हा हॉटेल व्यवसायिक त्याच्या हॉटेल मधील सामान संपल्याने मुरलीधर करंडे यांच्या दुकानात गेला असता महेबुब खंडू शेख रा.वडगाव लाख याने शिवीगाळ करून पैसे देतो की नाही असे म्हणून तु लय माजलास असे म्हणून शिविगाळ करून तलवार व दगडाने मारून गंभीर जखमी केल्याने बंडू लोहार यांच्या फिर्यादीवरून महेबूब शेख यांच्या वर कलम ३२६,३२५,३२४,५०४,५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून याचा अधिक तपास पो उपनी योगेश खटाने हे करीत आहेत.

– कुमार नाईकवाडी / तुळजापूर

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!