वन्यप्राण्यांसोबत विनोद भोसले यांनी अनोख्या पद्धतीने केला वाढदिवस साजरा

152

माळशिरस, दि. २१ :

सध्या वाढदिवस म्हटलं की अनावश्यक खर्च डीजे, पोस्टर्स, आतिशबाजी,मद्यपान अशा गोष्टी प्रामुख्याने येतात. मात्र या सर्व गोष्टींना फाटा देत माळशिरस तालुक्यातील लवंग या गावचे सुपुत्र विनोद भास्कर भोसले यांनी आपला वाढदिवस महाळुंग येथील ग्रामदैवत यमाई देवीच्या परिसरातील वन्य प्राणी यांना खाऊ वाटप करून साजरा केला. .या उपक्रमाचे महाळुंग पंचक्रोशीमध्ये कौतुक केले जात असून अनेक युवकांनी आपणही असाच वाढदिवस साजरा करायचा असाही संकल्प केलेला आहे.

विनोद भास्कर भोसले हे नेहमी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये अग्रेसर असतात व समाजाची बांधिलकी जपतात सध्या भिषण दुष्काळ असल्यामुळे अन्नाचा आणि पाण्याचा तुटवडा आहे मुक्या प्राण्यांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यांच्या अशा परस्थितीत एक दिवस त्यांना आपल्या वाढदिवसाचा अन्नम्हणून चारा मिळावा या उदात्त हेतू ने विनोद भास्कर भोसले आणि त्यांचे सोबत असलेले लवंग जिल्हा परिषद शाळाचे हेडमास्तर गायकवाड सर, दुधकर सर,लवंग ग्रामपंचायत सदस्य,लवंग धनाजी चव्हाण सर, पाटोळे सर उपस्थित होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!