वारकरी परंपरा व समाजाचे उद्बोधन करणारा आषाढी दिंडी सोहळा पिंपळा येथे संपन्न

9

तुळजापूर दि.१२ – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पिंपळा खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची बालदिंडी काढण्यात आली. विविध संतांच्या व वारकऱ्यांच्या वेशभूषा करून शाळेतील २५० बालवारकरी यात सहभागी झाले होते.

श्री. देविदास गायकवाड यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. विठ्ठल नरवडे , माधव मोरे ,शिवाजी वेदपाठक , राम शिंदे इ.उपस्थित होते . विठ्ठल नरवडे यांनी मुलांवर चांगले संस्कार करणारी व वारकरी सांप्रदायाचा वारसा जपणारी दिंडी याचे आयोजन शाळेने केले असून भौतिक प्रगतीबरोबरच सुसंस्कारित पिढी बनणे काळाची गरज असल्याचे सांगून त्यांनी शाळा मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

मुलांच्या मदतीने तयार केलेल्या पालखीत संत प्रतिमा ,ज्ञानेश्वरी ग्रंथ याबरोबरच पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या कामी महत्त्वपूर्ण असलेल्या वृक्षांचे महत्त्व ,वृक्ष लागवड व त्यांचे जतन करणे ही चळवळ बनावी यासाठी पालखीत वृक्षांचे रोपटे ठेवून त्याचेही पूजन करण्यात आले .” वृक्ष म्हणू की ऋषी म्हणून ते तर जनहित दक्ष ” या वचनाची सत्यता पटवून देणे व ते जोपासने याबाबत यातून आवाहन करण्यात आले. या बाल दिंडीत विठ्ठल, रुक्मिणी ,महादेव ,संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम, नारद मुनी ,संत जनाबाई, संत मुक्ताबाई यांच्या लक्षवेधी व आकर्षक वेशभूषा मुलांनी साकारल्या होत्या .तसेच इतर सर्वांनी वारकरी वेशात दिंडीत सहभाग घेतला होता. टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत दिंडी गावातील प्रदक्षिणा मार्गावरून निघाली. यावेळी गावातील भाविकांनी आपापल्या घरासमोर दिंडीचे स्वागत करण्यासाठी रांगोळी काढली व दिंडीचे पूजन करून दर्शनही घेतले. या सोहळ्यात गावातील भजनी मंडळ ,भाविक महिला व नागरिक यांच्या उत्स्फूर्त सहभागाने दिंडीत रंगत आणली तर झेंडेकरी टाळकरी यांचे “गोल रिंगण” हे या सोहळ्याचे आकर्षणाचे केंद्र ठरले .

संस्कृती व परंपरा जपत सध्याच्या काळात समाजासाठी उपयुक्त व गरजेचे संदेशही उपक्रमाच्या माध्यमातून दिले गेले. वृक्षसंपदा वाढवा असे सांगणारा “वृक्ष दूत ” व “स्वच्छतादूत” ही दिंडीत सहभागी होते.मुलांना मनमुराद आनंद देणारे पाऊल खेळणे ,फुगडी खेळणे यासारख्या सांप्रदायिक खेळाचा मुलाने आनंद घेतला .अशा उत्साही वातावरणात गावकरी व शिक्षक व महिला वर्गांनाही फुगडीचा मोह आवरला नाही .

यासाठी देवीदास गायकवाड ,शिवाजी वेदपाठक ,विठ्ठल नरवडे, प्रशांत वैद्यकर, मनोज पाटील ,पांडुरंग जावळे, बाळू मुंडे ,गुणवंत चव्हाण , माधव मोरे ,अंजली निकते यांनी विशेष योगदान दिले . विठ्ठल नरवडे यांनी सर्वाचे आभार मानले .

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!