विद्यार्थ्यांनी डीएनए पृथकरणचा प्रयोग करून वर्ल्ड रेकॉर्ड केला

55

लखनऊ : जगभरात अनेक ठिकाणी याना त्या कारणाने जागतिक विक्रम होतात तर यातील काहीच विक्रमांची नोंद ही गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यामध्ये होते. असाच एक जागतिक विक्रम लखनऊ मध्ये झाला असून त्याची नोंद गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे.

लखनऊ मधील विद्यार्थ्यांनी डीएनए पृथकरणचा प्रयोग करून वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. चौथे इंडियन इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलच्या अंतर्गत ५५० विद्यार्थ्यांनी डीएनए पृथकरणचा प्रयोग करून गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदविले आहे.

या प्रसंगी, भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या सचिव डॉ. रेणू स्वरूप यांनी सांगितले की, अशा प्रकारचे प्रयोग केवळ भारताचे नाव वाढवणार नाही तर विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड देखील वाढेल. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने जी.डी. गोयंका पब्लिक स्कूलमधील विद्यार्थ्यांमध्ये हे प्रयोग केले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी केळ्यापासून डीएनए पृथकरणचा प्रयोग केला. संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितले की यापूर्वी अमेरिकेतील ३०२ लोकांनी डीएनए पृथकरणचा प्रयोग करून विक्रम नोंदवला होता.

साभार – पुढारी ऑनलाईन

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!