शहापुर येथे कु-हाडीने मारहाणीत एक जखमी

16

नळदुर्ग, दि. 20 : शहापुर ता. तुळजापूर येथिल शिवारात बुधवार दि. 19 जून रोजी दुपारी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान शहापुर शिवारात शेतीच्या व्यवहारातुन दोन सख्ख्या भावात भांडण होवुन कु-हाडीने झालेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी झाला आहे.

दत्तु खंडा डावरे रा. शहापूर ता.तुळजापूर ह.मु. नळदुर्ग हे व आरोपी मुकूंद खंडा डावरे रा.शहापुर ता.तुळजापूर हे सख्खे भाऊ असुन दत्तु डावरे यांनी मुकूंद डावरे याचेकडे शेत नावावर करण्यासाठी झालेल्या खर्चाची मागणी केली असता मुकूंद खंडा डावरे याने मी पैसे देणार नाही असे म्हणुन शिवीगाळ करुन कुऱ्हाडीने दत्तु खंडा डावरे यांचे डोक्यात मारुन जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली म्हणुन दत्तु खंडा डावरे यांचे फिर्यादवरून मुकूंद खंडा डावरे याचेविरुध्द बुधवार रोजी नळदुर्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!