शालेय तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचे उद्घाटन

22

तुळजापूर:दि.२२,कुमार नाईकवाडी

तुळजापूर तालुका शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन तुळजापूर तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे , भाजपाचे गुलचंद व्यवहारे , नेते संदीप गंगणे ,तालुका क्रीडा मार्गदर्शक इसाक पटेल ,प्राध्यापक सतीश वडगावकर , अनिल धोत्रे , अनंत डुुरे , राजेश बिलकुल , विष्‍णु दळवी आदीच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी तालुक्यातील 14 ,17 वर्ष वयोगट मुलांच्या मैदानी स्पर्धेत एकूण 250 विद्यार्थी सहभागी झाले होते .

स्पर्धेचे पंच म्हणून आनंत दुरे , लाला आदतराव, बालाजी शिरसागर , जयहिंद पवार, यादवराव खंडू , राजेश बिलकुले, योगेश थोरबोले ,अजिक्य वराळे , अनिल धोत्रे , राऊत गोळ आदीनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इसाक पटेल, प्रास्ताविक अनिल धोत्रे यांनी तर आभार राजेश बिलकुल यांनी मानले.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!