शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली तंबाखू सोडण्याची शपथ

153

उमरगा – दि.११ जगामधील काही असाध्य रोगांपैकी कर्करोग हा एक होय. कर्करोग होण्याची अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण म्हणजे तंबाखूचे सेवन आहे. कायद्याने कितीही प्रतिबंधात्मक पावले उचलली असली तरी तंबाखूची लागलेली सवय सोडण्यासाठी मनाचा निर्धार असणे आवश्यक आहे असे मत प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव यांनी व्यक्त केले.

श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात जवळपास ३१०० विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तंबाखु मुक्त अभियानांतर्गत तंबाखूजन्य पदार्थ सोडण्याची शपथ घेतली. रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. विनोद देवरकर यांनी यावेळी सर्वांना संबंध हेल्थ फाउंडेशन मार्फत प्रकाशित केलेल्या शपथ पत्रचे सामूहिक प्रकट वाचन केले.

या वेळी उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, उपप्राचार्य संजय अस्वले, उपप्राचार्य बी. एन. गायकवाड, पर्यवेक्षक व्हि. जी. तडोळगे, आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!