शेकडो एकरावरील ऊस करपतोय

पाणी पातळी खालावली; कारखान्यांसमोर गाळपाचा प्रश्न

15

अंबाजोगाई : दत्ता खोगरे

निसर्गाच्या लहरीपणामुळे व अत्यल्प होणारा पाऊसामुळे ग्रीन बेल्ट परिसरातील शेकडो एकरावरील ऊस करपतोय मांजराधरणांचा पाणीसाठा शुन्य टक्के एवढा झाला आहे यामुळे ऊस पिकाला पाणीपाळी देता येत नसल्याने व भू – गर्भातील पाणीपातळी खालावल्यामुळे विंधनविहीरी कोरड्या पडल्या आहेत तर कुठे त्यांनी तळ गाठला आहे .

मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यावर ग्रीण बेल्ट मध्ये बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊसाची जोपासना करतात. पण ऊस पिकाच्या उपलब्धतेवर नँचरल शुगर, अंबा साखर, येडेश्वरी केज यासह लातूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांपुढे गाळपासाठी ऊस उपलब्धतेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. मागील दोन – तीन वर्षीपासुन सातत्याने निर्माण होणा-या दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस या नगदी पिकांवरच शेतक-यांची आशा असते.

मांजरा धरणात असलेल्या पाणीसाठ्यावर शेतकरी ऊस पिकाची लागवड करतात. पण या वर्षी शुन्य टक्के पाणीसाठा असल्यामुळे व पाण्याची उपलब्धता नसल्याने शेकडो एकर ऊस शेतक-यांनी मोडला आहे. तर उभा असलेला ऊस अत्यल्प पाणीसाठ्यामुळे करपतोय उभा असलेला ऊस जोपासण्यासाठी शेतकरी बोरवेलचा आधार घेतोय. पण अडीचशे ते तीनशे फुटापर्यत बोरवेल घेत आहेत. परंतू भूगर्भीतील पाणी पातळी खालावल्याने बोरवेला पाणी लागत नसल्याने शेतकरी नवनवे प्रयोग करत ऊसाची जोपासना करतांना दिसत आहे. हवामान खात्याने यावर्षी माँन्सुन वेळेवर दाखल होणार आहे या अपेक्षांवर शेतकरी ऊस जोपसतांना दिसत आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!