शेत जमिनीच्या वादातुन झालेल्या मारहाणीत एकाचा खुन, चार गंभीर

1,088

उस्मानाबाद : इकबाल मुल्ला

शेतजमीनीच्या वादातून झालेल्या हाणामारीत स्वत: च्या भाऊजीचा निघृन हत्या केली असून यात चार जण गंभीर जखमी आहेत. ही घटना लोहारा तालुक्यातील कास्ती (बुद्रुक) येथे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयीत आरोपींना लोहारा पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार लोहारा तालुक्यातील कानेगाव येथील माजी सैनिक बालाजी भगवान कवठे (वय 50) हे सेवानिवृत्त झाल्यानंतर कास्ती बुुद्रुक येथील मनोहर हरीपंत राकेलकर यांची पाच एकर आकरा गुंठे शेतजमीन खरेदी केली होती. ती शेत जमीन बालाजी कवठे यांनी पत्नीचे भाऊ ज्ञानेश्वर व्यकंट चव्हाण यांना भागीन म्हणून कसण्यासाठी दिली होती. त्यानंतर चार वर्षापासून शेतजमीनच्या मालकी बाबत ज्ञानेश्वर चव्हाण त्यांची पत्नी, गोन मुले सदरील शेचजमीन आर्धी आम्हाला द्या म्हणून बालाजी कवठे व त्यांच्या पत्नीला नेहमी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत होते.

बालाजी कवठे यांच्या पत्नीचा दुसरा भाऊ सुधाकर व्यंकट चव्हाण यांना पण तु बालाजीला साथ का देतो म्हणून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. याबाबत बालाजी कवठे यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दिली होती. यानंतर 14 मे रोजी बालाजी कवठे घरी असताना सांयकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास सुधाकर चव्हाण यांची मुलगी अश्विनीने फोन करून सांगितले, की ज्ञानेश्वर चव्हाण त्यांचे सचिन, तुषार हे त्यांच्या घरी येऊन तुच बहिणीला कोणी तोडले व बोरचे नुकासन केल्याचे सांगितले म्हणून वती शेती माझीच आहे ती मी कोणालाही देणार नाही. शेतात जो जाईल त्याचा मुडदा पाडतो म्हणून हातात कुऱ्हाड घेऊन सुधाकर चव्हाण व घरच्यांना मारहान करीत आहे. तुम्ही लवकर या असे म्हणाले. व माझी मावशी मुक्ताबाई लोभे कास्तीला आलो. ज्ञानेश्वर मामाच्या घरी गेलो तेव्हा मामा व त्यांची पत्नी अनुसया चव्हाण यांनी हे लय शेत मागत आहेत. यांना आजच पारच करून टाकू जीवंत सोडायचे नाही म्हणून मावशील सिमेंटच्या खांबाला बांधले. मी व दुसरे मामा सुधाकर मामी लक्ष्मी, त्यांची मुलगी दिव्या सोडविण्यासाठी गेलो तेव्हा ज्ञानेश्वर व त्यांचे दोन्ही मुले सचिन, तुषार आले. त्यातील तुषारने काठीने उगारले व सचिनने गच्चीला ढकलून दिले. तेव्हा माझे मामा सुधाकर त्याला आडवायला आले त्यावेळी ज्ञानशेश्वर सचिन, तुषार यांनी सुधाकर यांना काठीने बेदम मारहाण केली. व अनुसयाने खांबाला बांधलेल्या मावशीला जबर मारहाण केली. त्यानंतर चौघांनी लक्षमी व दिव्यांना मारहान केली. या वेळी मी काठी घेऊन गेलो असता सचिनने मला मारहान केली. त्यानंतर तुषारने घरातील कुऱ्हाड घेऊन मला मारण्यासाठीआला. तेव्हा मी पळून मी गाडीकडे गेलो. तेथे उभे असलेले माझे मित्र ज्ञानेश्वर मोरे प्रमोद हिंदोळे हे कानेगावकडे जात असताना मला सबटेशनजवळ पोलिस गाडी दिसली त्यांना माहिती दिली. यावेळी तात्काळ पो.नि.सर्जेराव भंडारे यांनी घटनास्थळी धाव घेवुन परिस्थिती नियंत्रणात आणली व जख्मीना अँम्बुल्नस मागवुन तात्काळ जख्मीना दवाखान्यात पाठवुन दिले. बालाजी भगवान कवठे (वय 55) यांना सचिन ज्ञानेश्वर चव्हाण (25), ज्ञानेश्वर चव्हाण (60), अनुसया चव्हण यांनी खाली पाडून काठीने बेदम मारहान केली. यावेळी तुषार चव्हाण (28) यांनी तुझा जीव घेतो, लय शेती शेती करतोस म्हणून कुऱ्हाडीने कपाळावर घाव घालून पालते पाडले. पुन्हा डोक्यावर वार करून जागीच ठार मारले. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मावशी मुक्ताबाईला केसाला धरून डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घातला. आळीपाळीने सचिनने लक्षमी, दिव्याला मारहान केली. यात माझ्या मावशी, मामा,मामी, मामाच्या मुलींना मारहान केल्याची तक्रार लोहारा पोलिसात दिली आहे. याप्रकरणी ज्ञानेश्वर चव्हाण पत्नी अनुसया चव्हाण, मुलगा सचिन, तुषार चौघा विरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!