श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात मंगळवारी भाविकांची अलोट गर्दी

18

तुळजापुर : कुमार नाईकवाडी

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदी माया आदी शक्ती असलेल्या श्री तुळजाई मातेच्या दरबारात दि.१४ मंगळवार रोजी भक्तीचा महासागर उलटला होता. धर्म दर्शन रांगा,अभिषेक रांगा मुख दर्शन रांगा श्री देवी भक्तांच्या गर्दीने ओसांडून वाहत होत्या.

ततपुर्वी पहाटे १ वाजता श्री देवीजीचे चरण तिर्थ होऊन भाविकांसाठी दरवाजे खुले करण्यात आले होते अभिषेक पास काढण्यासाठी राञी १२ वाजल्या पासुन श्री देवी भक्तांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती पहाटे २ ते ३ वाजता अभिषेक पास चे लिमिट संपल्याने बंद करण्यात आले. त्यानंतर येणाऱ्या भाविकांना अभिषेक पास विना वंचीत राहावे लागले पहाटे श्री कल्लोळ तिर्थ कुंडावर व गोमुख तिर्थ कुंडावर स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली होती.

मंगळवारी शहरातील सर्वच रस्ते व बाजार पेठा भाविकांच्या गर्दीने फुलुन गेल्या होत्या. धर्म दर्शनासाठी तीन तास लागत होते. तर मुख दर्शनासाठी दोन तास लागत होते रांगा संध गतीने चालत असल्यामुळे दर्शनासाठी आलेल्या श्री देवी भक्तांची मोठ्या प्रमाणावर ताराबंळ उडाली होती मंदीर संस्थानच्या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारा मुळे श्री देवी भक्तांना मोठा ञास सहन करावा लागत आहे. श्री देवी भक्त आपल्या लहान, लहान लेकरा बाळासह रांगे मध्ये तासन तास उभे राहून ताटकळत बसावे लागत आहे. तरी श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारातील रांगा जलद गतीने हलविण्यात याव्यात अशी मागणी श्री देवी भक्तामधुन होत आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!