श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचा ८०% टक्के निकाल

20

नळदुर्ग : सचिन गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश दिनांक ८ जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दहावीच्या परीक्षेचा निकाल हाती आला त्यामध्ये श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील मुलींनीच दहावीच्या परीक्षेमध्ये बाजी मारली आहे.

श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालयातील २८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती तर भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचा निकाल सरासरी 80 टक्के लागला असून त्यामध्ये मुलींनीच बाजी मारली आहे विद्यालयातून प्रथम येण्याचा मान कुमारी शुभांगी सतिश गायकवाड या विद्यार्थिनीने ७२.४० टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर विद्यालयातून दुतिय क्रमांक चैतन्य यशवंत मोटे या विद्यार्थ्याने विद्यालयातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

तर तृतीय क्रमांकाची विद्यार्थिनी मोनिका वैजनाथ घोडके या विद्यार्थिनी पटकावला आहे. दहावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यालयातील शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!