श्री श्री गुरुकुल मध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडी

18

अणदूर दि . १२ – येथील श्री श्री गुरुकुल व रविशंकर विद्यामंदिर येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने गावातून दिंडी काढण्यात आली. “जय जय राम कृष्ण हरी” व “ज्ञानोबा माऊली तुकाराम” च्या जय घोषात चिमुकल्यांनी दिंडी काढली.

यामध्ये विठ्ठल-रुक्मिणी , संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज सह वारकरी पोषाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. झाडे लावा- झाडे जगवा , मुलगी वाचवा – मुलगी शिकवा आदी घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. दिंडीच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख मंजुषा मोरखंडीकर ,शर्मिला गुरव,दशरथ शिंदे, मयुरी कुलकर्णी, शुभांगी पानगावकर, नागिनी बिराजदार, गायत्री मोरे, शुभांगी चौधरी, ज्योती रामपुरे, किशोर जाधव,मार्तंड मोकाशे आदींनी परिश्रम घेतले.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!