श्री सिद्धेश्वर निवासी विद्यालय वरवंटी येथे वृक्षांचा वाढदिवस साजरा

8

उस्मानाबाद दि.१७

बुधवार दि.१७ रोजी उस्मानाबाद जिल्हा स्वातंत्र्य सैनिक समिती संचालित श्री सिद्धेश्वर निवासी विद्यालय वरवंटी येथे दिनांक वृक्षांचा द्वितीय वाढदिवस उत्साहत केक कापून साजरा करण्यात आला.

17 जुलै 2017 रोजी संस्था सचिव दिलीपराव गणेश यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या परिसरात 15 वृक्षांची लागवड केली होती. या वृक्षाला दोन वर्ष पूर्ण झाली .दिलीपराव गणेश व विद्यालयातील शारीरिक शिक्षक आगळे डी .बी .यांच्या वाढदिवसानिमित्त विदयार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .आगळे डी. बी यांच्या वतीने विध्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.तर शाळेच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते नवीन वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य रवी देशमुख, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष बेद्रे, ग्रामपंचायत सदस्य सौ अलक सरपाळे, ओंकार आगळे, माजी विध्यार्थी सुदर्शन देशमुख, शंकर म्हेत्रे, मुख्याध्यापक गोकुळदास नेरे, सहशिक्षक लक्ष्मण लोमटे, चौरे बिरमल, सरवदे कांबळे, सौ माधुरी देशमुख, रंगनाथ देशमुख, विलास खरात, पालक, विध्यार्थी उपस्थित होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!