सर्व धर्मातील समभाव बांधिलकी हेच राष्ट्र हिताचे कार्य – डॉ. विठ्ठलराव जाधव

65

उस्मानाबाद : इकबाल मुल्ला

सर्व धर्मातील समभाव बांधिलकी हेच राष्ट्र हिताचे कार्य आहे, असे प्रतिपादन डॉ. डॉ.विठ्ठलराव जाधव, विशेष पोलीस महानिरीक्षक, तुरुंग विभाग, महाराष्ट्र शासन यांनी केले.

महात्मा बसवेश्वर जयंती सोहळा 2019 निमित्य बसव प्रतिष्ठाण च्या वतीने उमरगा तालुक्यातील मुरुम येथे राज्यातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यबद्दल राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार सोहळा घेण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प.पु. कोरनेश्वर अप्पाजी (मठादीपती, उस्तुरी मठ) होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विठ्ठलराव जाधव (विशेष पोलीस महानिरीक्षक, कारागृह विभाग, महाराष्ट्र शासन), उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.राहुल धस (उमरगा), पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते किरण गहेरवार, अदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. विठ्ठलराव जाधव म्हणाले, भारत देश विविध समाजाने थाटलेला आहे, या सर्व समाजातील समभावाची बांधिलकी जोपासणाचे कार्य हेच राष्ट्र हिताचे कार्य आहे, 12 व्या शतकातील महापुरुष महात्मा बसवेश्वर यांचे विचार प्रेरणादाई आहे, त्याचा युवकांनी अवलोकन करावे, बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष रामलिंग पुराणे यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम राबवत आहेत, असे कार्य सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सतत घडत रहावे असेही ते म्हणाले, महापुरुषांचा विचार जिवंत ठेवून त्यांचे विचार आचरणात आणून समाजकार्य करत रहावे असे मनोगत व्यक्त केले. बसव प्रतिष्ठाण च्या वतीने दरवर्षी महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त राज्यातील विविध क्षेत्रातील विविध धर्मातील व्यक्तींचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल बसवरत्न पुरस्काराने गौरविण्यात येते, यावर्षी त्यांच्या या सन्मान सोहळ्याच दुसरे वर्ष होते.

डॉ. विठ्ठलराव जाधव, श्री.फुलचंद टेकाळे, श्री. शरणप्पा मेंगशेट्टे यांना जीवनगौरव पुरस्काराने शाल,सन्मान चिन्ह,सन्मानपत्राने सन्मान करण्यात आला तर शंकरराव बोरकर,मुंबई— उद्योजक, किरण गहेरवार, पुणे-सामाजिक, महेश डोकोळे, अकलूज-सोशल मीडिया, श्रीपती कोरे, इचलकरंजी-कला, रमेश मोकाशी, इचलकरंजी-सोशल मीडिया, शिंदे महेश, परंडा-शिक्षक, अशोक बनसोडे, उमरगा-सामाजिक, बबन बनसोडे, मुरूम- सामाजिक, आप्पासाहेब बिराजदार, बेलंब, राहुल धस, उमरगा-अधिकारी, डॉ.भुरे रमेश, के.जवळगा-शिक्षक, संजय कारभारी, कलदेव लिंबाळा-अधिकारी, सावलजकर रामलिंग, अकलूक-शिक्षक, संजय कोथळीकर,उमरगा- कला, राजाराम पाटील, सांगली- बसव कथाकार, वेदमूर्ती सडकसिरी स्वामी, मुरूम- संस्कृतिक/सामाजिक, सतीश तोळनुरे, वरनाळ – शिक्षक, सिद्राम भालके,आलूर-शिक्षक, वीरेंद्र हिंगमीरे, सोलापूर-उद्योजक, युवराज पवार, औसा-शासकीय कर्मचारी असे 23 व्यक्तींचा बसवरत्न पुरस्काराने शाल, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन बसव प्रतिष्ठाणच्या वतीने गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष रामलिंग पुराणे व सूत्रसंचालन किरण गायकवाड यांनी केले तर किरण गहेरवार यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लिनाथ बदोले, अशोक घोडके, शेकर माळी, शिवराज पुराणे, सूर्यकांत बेडजुर्गे, सिद्राम अस्टेकर, अशोक काळशेट्टी, सुनील पुराणे, दत्ता अनंतपुरे, महेश बोंडगे, श्रीकांत कांबळे आदींनी परिश्रम घेतले, प्रमुख उपस्थित मान्यवरांना महात्मा बसवेश्वर यांचा अर्धपुतळा भेट देऊन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!