सोलापुर येथे कै. गिरीष सतीश जम्मा यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबीर संपन्न

20

सोलापूर, दि. २२ : येथील श्री सिद्धेश्वर हायवे सेंटर यांच्या वतीने कै. गिरीष सतीश जम्मा यांच्या स्मरणार्थ शनिवार दि. २२ जून रोजी रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबिरात जवळपास सातशे रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सध्या विविध रक्तपेढ्या मध्ये रक्त संकलन पाहिजे. त्या प्रमाणात होत नसल्याने रक्ताचा तुटवडा भासत आहे. यामुळे विविध ठिकाणी उपचार घेत असलेल्या रूग्णांना तसेच नातेवाईक यांना रक्ततुटवड्याचा परिणाम दिसत असून एक सामाजिक बांधिलकी या उद्देशाने श्री सिध्देश्वर हायवे सेंटर (पेट्रोल पंप ) व मेडिकेर ब्लड बॅक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे शनिवार दिनांक 22 जुन रोजी सोलापुर येथील श्री सिद्देश्वर पेट्रोल पंप येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सातशे रक्तदात्यानी रक्तदान केले . प्रत्येक रक्तदात्यास रक्तदान केल्याबद्दल 5 लिटर पेट्रोल भेटवस्तु म्हणून देण्यात आले. यावेळी नगरसेवक किरण देशमुख, प्रकाश वाले, विराज पाटिल, योगेश केर्दें , सतिश जम्मा , संतोष बंडगर, विरेश उंबरजे , आदीजण उपस्थित होते.

कार्यकर्म यशस्वी करण्यासाठी सिटी फायटर युथ फांऊडेसनचे अध्यक्ष योगेश जम्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!