सौ. सविता जाधव यांना राज्यस्तरीय सांस्कृतिक महिला गौरव पुरस्काराने सन्मानित

115

उस्मानाबाद : इकबाल मुल्ला

लोहारा शहरातील न्यू व्हीजन इंग्लिश स्कूलच्या संचालिका सौ सविता शहाजी जाधव यांना सांस्कृतिक महिला गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लातूर येथील दयानंद सभागृहात हा भव्य सोहळा संपन्न झाला. चौथ्या राष्ट्रीय प्युपिलस् आँलिमपिक असोसिएशन, इंडिया या संस्थेतर्फे हा पुरस्कार समाजातील शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, सामाजिक, राजकिय, अशा विविध क्षेत्रात अविरत व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना “महिला गौरव पुरस्कार “देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लातूर येथील ग्लोबल नाँलेज स्कूलचे संस्थापक तथा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त श्री रमेश बिरादार होते. तर प्रमुख म्हणुन आनंद धुमाळ, डॉ सुभाष हुलपले, संस्थेचे अध्यक्ष डाँ महेश मोटे, सचिव महमंदरफि शेख, सदस्या सायराबानो शेख, सलागार शिवराम भोसले, आदि मंचावर उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोहारा येथील न्यू व्हीजन इंग्लिश स्कूलच्या संचालिका सौ सविता शहाजी जाधव यांना शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात भरीव कार्य केल्याबददल आणि संस्थेच्या माध्यमातून विधारथीनां राष्ट्रीय पातळीवर जाऊन यश प्राप्त करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. तसेच ग्रामीण भागातील मुलां-मुलीनां दर्जेदार इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिल्याबददल “राज्यस्तरीय सांस्कृतिक महिला गौरव 2019” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सविता जाधव यांचे उस्मानाबाद जिल्हा एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष डॉ सुहास भोसले, न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शहाजी जाधव, संचालिका सौ माधुरी चोबे, स्कूलचे सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी तसेच पालकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!