हंगरगा येथील उद्योजक  प्रशांत बसवराज हत्ते यांच्या तर्फे पुरग्रस्तांना मदत

280

जळकोट,दि.२२,मेघराज किलजे

कोल्हापूर जिल्ह्यातील आरे आणि गोडगोंडवाडी या गांवातील सत्तर गरजू कुटुंबियांना (पुरग्रस्तांना) हंगरगा (ता.तुळजापुर )येथील रहिवासी व पुणे येथील तरुण उद्योजक प्रशांत हत्ते यांनी दैनंदिन स्वयंपाक घरात लागणारी संपूर्ण भांडी पुरग्रस्तांना भेट म्हणून दिली.
सध्यस्थितीला सांगली,कोल्हापूर भागात पुरामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले असून समाजाचे आपण देणे लागतो.तेंव्हा गरजूंना मदत करण्याची ईच्छा झाली . तेंव्हा पुरग्रस्त भागातील नागरिकांची झालेली दयनीय अवस्था पाहून त्यांना आपल्या परीने मदत करण्याचे ठरविले.
पुरग्रस्त कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील गाडे गोंडवाडी , आरे या गांवातील गरजू सत्तर कुटुंबियांना दैनंदिन स्वयंपाक घरात लागणारी स्टीलची पाच ताट,पाच वाटी,पाच तांब्या ,स्टोव्ह,पाच ग्लास,पाच प्लेट,पाच चमचा,पाच फुलपात्र,पाच मोठे चमचे ,उलतन, वगराळ,डबा सेट पाच, चाळणी, गाळणी, पोळपाट,बेलन,काटवट,तवा,परात,भगोणे दोन, भातवाडी, खिसणी, बादली अशी सर्व सामान एका पोत्यात भरुन असे एकूण सत्तर कुटुंबियांना घरोघरी जावुन वाटप केल्याचे हर्षल प्रशांत हत्ते यांनी सांगितले .
यावेळी त्यांच्यासोबत त्यांना मदत करायला त्यांचे सहकारी मित्र आकाश कानाडे,राष्ट्रपाल कांबळे ,सागर माळी,हणमंतराव माळी,प्रवीण कांबळे यांची मोलाची मदत झाल्याचे सांगितले .वेळोवेळी गरजवंताना मदत करणे हेच तुमच्या हृदयाची खरी श्रीमंती असल्याचे मत प्रशांत हत्ते यांनी सांगितले व समाजातील अन्य दानशूर व्यक्तींनी पुरग्रस्तांना मदत करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!