होर्टी ग्रामपंचायत निवडणुकीत कोण मारणार बाजी ?

होर्टी ग्रा.पं. निवडणुकीसाठी ८० टक्के मतदान

173

नळदुर्ग : सचिन गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील बहुचर्चित ग्रामपंचायतींच्या मतदानाला दिनांक २४ रोजी सकाळी सात वाजता सुरुवात झाली. एकुण मतदानाच्या सरासरी मतदान ८० % मतदान झाले. यामध्ये बहुजन ग्रामविकास पॅनेल विरुद्ध समता ग्रामविकास पॅनल या पॅनल मध्ये अटीतटीचा सामना होण्याची शक्यता आहे.

बहुजन ग्रामविकास पॅनेलच्या सरपंच पदाच्या उमेदवार सौ. सुवर्णा सिनाप्पा गुंजिटे तर समता ग्रामविकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार सुरेखा विरनाथ मुळे यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. वार्ड क्रमांक चार मध्ये सरपंच ज्ञानेश्वर भोसले विरुद्ध उपसरपंच मानतेश पाटील हे दोघेही एकमेकांच्या विरुद्ध शड्डू ठोकून उभे आहेत. वार्ड क्रमांक ४ मध्ये कोण कोणावर सर्जिकल स्ट्राइक करणार याची उत्सुकता सुद्धा मतदाराला लागली आहे.

सरपंच पदाच्या उमेदवाराला क्रास मतदानाचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे जाणकार मतदारांकडून बोलले जात आहे. तर होर्टी गावातील मुस्लिम, गवंडी,मागासवर्गीय समाजातील मतदाराच्या वर्चस्वावरच सरपंच पदाची विजयाची माळ इतर समाजातील निर्णायक मताच्या जोरावरच सरपंच पदाचे उमेदवार निवडून येणार असल्याचे खाञीशीर मतदानातून बोलले जात आहे.

एकुण मतदार २७२९ आहेत त्या पैकी २१८५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. वार्ड क्र. १ मध्ये ४१६, वार्ड क्र. २ मध्ये ५८९, वार्ड क्र. ३ मध्ये ६४१, वार्ड क्र. ४ मध्ये ५३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सरपंच पदाच्या उमेदवारांसह सदस्याचे भवितव्य मतदार यंञामध्ये सीलबंद झाले आहे.

सध्या उमेदवारांसह अतिउत्साही कार्यकर्ते आकड्यांची जुळवाजुळव करत आहे. दि. २५ रोजी सरपंचपदाच्या उमेदवारांसह नविन ग्रामपंचायत सदस्य आपले नशीब आजमावणार आहेत. तर एकुण मतदानाच्या सरासरी मतदान ८० % मतदान झाले.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!