८ व ९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले अक्कलकोट मध्ये

जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी यांची ट्रेनिंग

15

अक्कलकोट : प्रवीणकुमार बाबर

काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत अक्कलकोट येथे प्रियदर्शनी मंगल कार्यालयात केंद्राअध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्यासाठी ट्रेनिंग चे आयोजन करण्यात आहे.

२५०, अक्कलकोट लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे कामकाज वेगाने सुरू असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मोहिणी चव्हाण, व सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांनी दिली.

लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राअध्यक्ष व मतदान अधिकारी यांची निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, अक्कलकोट२५० लोकसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्वच खात्यातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची निवडणूक ट्रेनिंग आयोजित केली होती.

दरम्यान, मागील झालेल्या त्या ट्रेनिंग ला जवळपास 100 कर्मचाऱ्यांची गैरहजेरी असल्याने त्या सर्वच कर्मचाऱ्यांवर निवडणूक आयोगाने लोकप्रातिनिधी कायदा१९५१ कलम १३४ प्रमाणे नोटिसा काढून दणका दिला आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!