नळदुर्ग येथे भरधाव वेगाने वाहन चालविणा-यावर गुन्हा दाखल

117

नळदुर्ग, दि. 3 : येथील बसस्थानकासमोर दि. 2 जानेवारी रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास ॲपेरिक्षा भरधाव वेगाने चालविल्यावरुन एकाविरुध्द नळदुर्ग पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भगवंत निवृत्ती जाधव, रा. नळदुर्ग याने त्याच्या ताब्यातील ॲपेरिक्षा क्रं. एम.एच. 25 एम. 1170 ही लोकांच्या जिवीतास धोका होईल अशा रितीने व निष्काळजीपणे भरधाव वेगाने चालवित असताना मिळून आला. भगवंत निवृत्ती जाधव याच्याविरुध्द दि. 2 जानेवारी रोजी नळदुर्ग पोलिसात भादविचे कलम 279 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!