होळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दिगंबर पवार

47

लोहारा दि. १४ ,

होळी ता.लोहारा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी दिगंबर पवार यांची फेरनिवड तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण राठोड यांची निवड करण्यात आली आहे.

शनिवार दि.१३ रोजी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अशोक रोडगे हे होते.प्रथम शाळेतील शिक्षक वनराज सुर्यवंशी यांनी शासन निर्णयाचे वाचन करुन समितीसाठी आवश्यक आरक्षणाची माहिती दिली.उपस्थित पालकांनी सदस्यांची निवड केली.सदस्य निवडीनंतर एकमताने दिगंबर पवार यांची अध्यक्ष म्हणुन तर लक्ष्मण राठोड यांची उपाध्यक्ष म्हणुन निवड केली.

या शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य म्हणून सुषमा मडुळे,छाया गायकवाड,रोहिणी गायकवाड,अपेक्षा पाटील,विठ्ठल गायकवाड ,बळीराम सुरवसे,विठ्ठल जमादार,बजरंग जाधव , (शिक्षणप्रेमी सदस्य), केशव सरवदे (ग्रा.पं.प्रतिनिधी) यांची निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित सर्व सदस्याचे सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी शाळेतील शिक्षक गणेश वाघमारे, प्रमोद माने, सतीश माळी, चंद्रकांत सौदागर ,विलास नेलवाडे आदी उपस्थित होते.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!